Pune Crime : माता न तू वैरिणी! जुळ्या मुलांना दिला जन्म, तिनेच घेतला जीव; काय आहे नेमंक प्रकरण?

Pune Crime : माता न तू वैरिणी! जुळ्या मुलांना दिला जन्म, तिनेच घेतला जीव; काय आहे नेमंक प्रकरण?

पुणे क्राइम: जुळ्या मुलांचा खून, आईने घेतला जीव; लोणी काळभोर पोलिसांनी आरोपी आईला अटक केली.
Published by :
Team Lokshahi
Published on

आईच्या मायेला मोल नाही असे, आपण नेहमीच म्हणतो. परंतू पुण्यामध्ये एका आईचा अजब प्रकार समोर आला आहे. जुळ्या मुलांची वाढ नीट होत नसल्याने आईने त्यांना घराच्या छतावरील पाण्याच्या टाकीत बुडवून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पुणे- सोलापूर रस्तावरील थेऊर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलांचा खून केल्यानंतर आरोपी आईने आत्महत्त्येचा प्रयत्न केला होता. सदर प्रकरणाबद्दल लोणी काळभोर पोलिसांनी आईला मंगळवारी रात्री उशिरा अटक केली.

जुळ्या मुलांचा खून केल्याप्रकरणी आरोपी आई प्रतिभा हेमंतकुमार मोहिते (वय 35) मिरजवाडी येथे तिला अटक करण्यात आली. याबाबत वस्तीमध्ये राहणारे प्रल्हाद लक्ष्मण गोंड यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी आई सध्या माहेरी राहायला होती. त्याचबरोब मृत मुलांचे वडील सांगलीतील एका बॅंकेमध्ये कामाला असल्याची पोलिसांकडून माहिती मिळत आहे.

नेमंक प्रकरण काय?

दहा वर्षांपूर्वी प्रतिभा आणि हेमंतकुमार यांचा विवाह झाला होता. लग्नाला दहा वर्ष होऊन सुद्धा जोडप्याला अपत्यप्राप्ती होत नव्हती. अखेर त्यांनी कृत्रिम पद्धतीने अपत्याला जन्म देण्याचे ठरवले. कृत्रिम पद्धतीने गर्भधारणा करत प्रतिभाने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. मुल दोन महिन्यांची झाले तरी त्यांची वाढ नीट होत नसल्याचे प्रतिभाच्या लक्षात आले. मंगळवारी सकाळच्या वेळेस प्रतिभा जुळ्या मुलांना घेऊन छतावर गेली. त्यानंतर दोघांना छतावरील पाण्याच्या टाकीत बुडवले. दरम्यान तीने सुद्धा आत्महत्त्येचा प्रयत्न केला. सदर घटना वस्तीमध्ये राहणाऱ्या रहिवाशाने पाहिली. त्यांनी क्षणाचा विलंब न करता प्रकरणाची माहिती प्रल्हाद गोंडे यांना दिली. मुलांसह प्रतिभाला पाण्याच्या टाकीतून बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू उपचारांपूर्वी जुळ्या मुलांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com