Ghatkopar accident: कुर्लानंतर आता घाटकोपरमध्ये भीषण अपघात! टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटले अन्...

Ghatkopar accident: कुर्लानंतर आता घाटकोपरमध्ये भीषण अपघात! टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटले अन्...

घाटकोपरच्या चिराग नगर मार्केटमध्ये टेम्पोने पाच जणांना चिरडले, एक महिला ठार, चार जखमी. पोलिसांनी चालक उत्तम खरातला ताब्यात घेतले.
Published by :
Prachi Nate
Published on

कुर्लाची बेस्ट अपघात घटना ताजी असतानाच घाटकोपरमध्ये देखील एक धक्कागायक घटना घडली आहे. घाटकोपर मध्ये एक टेम्पो नारायण नगरहून घाटकोपरच्या दिशेने भरधाव वेगाने येत होता. टेम्पो चालकाने टेम्पो भाजी मार्केटमध्ये घुसवून पाच जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. घाटकोपरच्या चिराग नगर मार्केट मध्ये ही घटना घडली आहे.

या घटनेत प्रीती रितेश पटेल या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.तर रेश्मा शेख, मारूफा शेख, तोफा शेख आणि मोहरम अली अब्दुल रहीम शेख हे पादचारी जखमी आहेत.या प्रकरणी चालक उत्तम बबन खरात याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

चिराग नगर मार्केटमध्ये शिरतानाच अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने बाजारात आलेल्या पाच जणांना चिरडले. स्थानिकांनी जखमींना राजवाडी रुग्णालयात उपचारासाठी नेले.घटनास्थळी घाटकोपर पोलीस दाखल झाले आणि त्यांनी चालक उत्तम खरात आणि टेम्पोला ताब्यात घेतले आहे.रात्री उशिरापर्यंत या बाबत पोलिसांचा तपास सुरू होता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com