Crime
Akola News : आई बाहेर, घरात नराधम बाप! सावत्र वडिलांकडून 5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार
अकोला शहरात पुन्हा एकदा मानवी नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. बापाने एका पाच वर्षांच्या निरागस चिमुकलीवर अत्याचार केला आहे.
अकोला शहरात पुन्हा एकदा मानवी नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावत्र बापाने एका पाच वर्षांच्या निरागस चिमुकलीवर अत्याचार केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी पीडित मुलीची आई गरबा पाहण्यासाठी बाहेर गेली होती. रात्री 10:30 वाजताच्या सुमारास सावत्र वडिलांनी निर्दयी कृत्य करत बालिकेवर अत्याचार केला. त्यानंतर मुलीला तीव्र वेदना जाणवू लागल्याने आई घरी परतल्यावर तिने रडत घडलेला प्रकार सांगितल.
तत्काळ बालिकेला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.खदान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोग्य विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.