Chhatrapati Sambhajinagar : '...नाही तर पेट्रोल टाकून जाळू' हुंडा दिला तरी विवाहितेचा सासरच्यांकडून जाच सुरुच
नुकतचं पुण्याचे वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण चांगलच पेटलेलं पाहायला मिळालं पाहायला मिळत आहे. या प्रकरणी तिची सासू-सासरे, नवरा, नणंद आणि दिर यांना आरोपी म्हणून सध्या अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण सुरु असताना आता छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाच लाख हूंडा दिला तरी विवाहितेला पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.
अमरावती शहरात राहणाऱ्या एका तरुणीचा दहा महिन्यांपूर्वी संभाजीनगर जिल्ह्यातील एका तरुणासोबत विवाह झाला होता. लग्नाच्या वेळेस मुलीच्या माहेरच्यांनी तिच्या सासरच्यांना पाच लाख रुपये हुंडा दिला होता. सासरच्या मंडळींनी तिला आईकडून आणखी पैसे आणण्यास सांगितले व तिने पैसे आणण्यास नकार दिल्याने तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला.
सासरच्या मंडळींकडून विवाहित महिलेला मारहाण झाल्याने गर्भपात झाल्याचे ही तक्रारीत उल्लेख करण्यात आलं आहे. अमरावती शहर पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. याप्रकरणी अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये विवाहितेच्या पतीसह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.