Pimpri Chinchwad Crime : तिचा वाढदिवस साजरा होताच ती मृतावस्थेत! फुल प्लॅन मर्डरनंतर आरोपी स्वतः कबुली देण्यासाठी पोलिसांसमोर गेला
कोणतही नात म्हटलं की, त्यात महत्त्वाचा असतो तो विश्वास. कोणत्याही नात्यात अडकण्यासाठी त्या दोन व्यक्तींमध्ये आणि त्यांच्या नात्यात एकमेकांप्रती आदर, प्रेम आणि विश्वास हा लागतोच. तरचं ते नात अतूट राहत आणि टिकतं देखील. मात्र सध्याच्या घडीला नात टिकवणं फार अवघड झालं आहे. त्यात पण जर ते नात नवरा-बायको किंवा प्रियकर-प्रियसी यांच्यातील असेल, तर तिसऱ्या व्यक्तीमुळे त्यांच्या नात्यात अविश्वास निर्माण होऊन होत्याच न्हवत होतं. अशा अनेक घटना आतापर्यंत कानावर पडल्या आहेत.
अशातच पुण्यातील पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. 10 ऑक्टोबरला प्रेयसीचा वाढदिवस साजरा केल्यानंतर प्रियकराने तिला संपवले. या घटनेमुळे संपुर्ण शहर हादरले असून ही हत्या संशयातून झाली असल्याचं समोर आलं आहे. डी-मार्टमध्ये काम करणारी मेरी तेलगू हॉटेल व्यावसायिक दिलावर सिंगच्या प्रेमात पडली. त्यांची सुमारे सहा वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. त्यानंतर मैत्री आणि या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांचही एकमेकांवर प्रेम जडलं होत.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून दिलावरला मेरीवर संशय होता. मेरी त्रयस्थ व्यक्तीच्या प्रेमात पडली असल्याचा संशयावरुन त्याने तिच्या वाढदिवसाची संधी साधून तिची हत्या केली. दिलावर मेरीला तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी वाकड येथील एका लॉजवर घेऊन गेला. केक कापल्यानंतर दिलावरने मेरीवर चाकू आणि ब्लेडने सपासप वार केले ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. त्यानंतर दिलावर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आणि त्यानेच मेरीची हत्या केली असल्याचं कबुल केलं. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.