Jalgaon Crime : लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला, जावयावर वार करत घरच्यांनीच पुसलं लेकीचं कुंकू

Jalgaon Crime : लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला, जावयावर वार करत घरच्यांनीच पुसलं लेकीचं कुंकू

जळगावमध्ये लव्ह मॅरेजच्या सूडातून जावयाचा निर्घृण खून, सासरच्या लोकांनी पुसलं लेकीचं कुंकू, वाचा सविस्तर बातमी.
Published by :
shweta walge
Published on

जळगावमध्ये हादरवणारी बातमी समोर आली आहे. सासरच्या लोकांनी आपल्याच लेकीच्या कपाळाचं कुंकू पुसत जावयाचा निर्घृण खून केलीय. आपल्या घरातील मुलीशी 5 वर्षापूर्वी केलेल्या लव्ह मॅरेजचा सूड उगवत कुटुंबियांनी तरूणाची हत्या केली.

या घटनेत मुकेश रमेश शिरसाठ या प्रेमविवाहित तरुणाची हत्या झाली आहे. तर त्याच्या कुटुंबातील 7 जण जखमी झालेत. या घटनेत जळगावात सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा आहे. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण असून प्रेमविवाहाचा बदलातून झालेल्या हत्याकांडाने खळबळ मजली आहे. परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलाय. घटनेचा तपास सुरू आहे.

मुकेश रमेश शिरसाठ याने जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरातील पूजा या तरूणीशी पळून जाऊन लग्न केलं. त्यांचं हे लव्ह मॅरेज मुलीकडच्यांना पसंत नव्हतं, यामुळे त्यांच्या मनात मुकेशबद्दल राग होता. त्यांच्या लग्नाला 5 वर्ष झाली तरी तेव्हापासूनच दोन्ही कुटुंबात सतत वाद होत होते, अजूनही ते वाद कायम होते. या वादाचे पर्यवसान रविवारी थेट हाणामारीत झाले. रविवारी मुकेश हा कामासाठी घराबाहेर पडला, तेव्हा त्याच्या सासरच्या काही लोकांनी त्याला घेरलं आणि त्याच्यावर कोयता व चॉपरने वार करत प्राणघातक हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या मुकेशचा जागीच मृत्यू झाला.

मुकेशवर हल्ला झाला तेव्हा त्याला वाचवण्यासाठी त्याचे भाऊ, काका, काकू, दोन चुलत भाऊ, चुलत बहीण मध्ये आले, मात्र मुलीच्या कुटुंबियांनी त्यांच्यावरही वार केल्याने तेही जखमी झाले. त्यांच्यावर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com