Kandivali Crime
Kandivali Crime

Kandivali Crime: कांदिवली लैंगिक अत्याचार प्रकरणात मनसेनंतर भाजपचीही आक्रमक भूमिका

Hospital Negligence: कांदिवलीतील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात भाजप आमदार योगेश सागर रुग्णालयाच्या दुर्लक्षाबाबत प्रश्न उपस्थित करत तातडीने कठोर कारवाईची मागणी केली.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

कांदिवलीतील एका ५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात मनसेनंतर भाजपनेही सक्रिय भूमिका घेतली आहे. भाजपचे आमदार योगेश सागर यांनी आज विधानसभेत या गंभीर घटनेवर जोरदार प्रश्न उपस्थित केले. त्यांनी शताब्दी रुग्णालयातील उपचार प्रक्रियेत झालेल्या हलगजरपणाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली.

Kandivali Crime
Nallasopara Crime: धक्कादायक! नालासोपाऱ्यातील बेपत्ता असलेल्या चिमुकल्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडला, नेमकं प्रकरण काय?

सागर यांनी रुग्णालयातील उपचार सुरू असतानाच झालेल्या दुर्लक्षासाठी जबाबदार कोण हे सभागृहात थेट प्रश्न विचारला. तसेच, मेडिकल कागदपत्रे भरताना होणाऱ्या विलंबाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत मुलीच्या जीवापेक्षा कागदपत्रांना अधिक महत्त्व देण्याचा आरोप रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांवर केला.

Kandivali Crime
Solapur Crime: धक्कादायक! सासरच्या मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, परिसरात खळबळ

लैंगिक अत्याचाराच्या या धक्कादायक प्रकरणात सरकारने तातडीने हस्तक्षेप करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार योगेश सागर यांनी केली आहे. आमदारांनी प्रकरणाची गांभीर्याने चौकशी होऊन पुढील प्रक्रियेत पारदर्शकता आणि तत्परता ठेवण्याची गरज देखील अधोरेखित केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com