Crime News: लातूरमध्ये मध्यरात्री घातक हाणामारी; तरुणावर धारधार शस्त्राने केले भयंकर हल्ला

Crime News: लातूरमध्ये मध्यरात्री घातक हाणामारी; तरुणावर धारधार शस्त्राने केले भयंकर हल्ला

Maharashtra News: लातूर शहरातील मध्यरात्री झालेल्या हाणामारीत २२ वर्षीय प्रज्वल मस्के यांचा चाकूने हल्ला करून मृत्यू झाला.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मध्यरात्री दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत २२ वर्षीय प्रज्वल मस्के या तरुणावर चाकूने वार करून हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आणि काही काळ वाहतूकही खोळंबली होती.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, चौकातील रहदारीच्या ठिकाणी दोन गटांमध्ये अचानक वाद सुरू झाला आणि तो हाणामारीत परावर्तित झाला. या हल्ल्यात प्रज्वल मस्के यांना जबर मारहाण करण्यात आली तसेच चाकूने वारही करण्यात आले. याचवेळी घटनास्थळाजवळून जात असलेले आमदार अमित देशमुख यांनी ही परिस्थिती पाहिली आणि तत्काळ मदत करून जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली.

रुग्णालयात उपचार सुरू असताना प्रज्वल मस्के याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच विवेकानंद पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांनी आरोपींचा शोध घेतला असून, हा वाद नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर लातूर शहरात सुरक्षा वाढवण्यात आली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Summary
  • लातूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मध्यरात्री दोन गटांमध्ये हाणामारी.

  • प्रज्वल मस्के यांना चाकूने हल्ला, रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू.

  • आमदार अमित देशमुख घटनास्थळी मदतीस आला, पोलीस तपास सुरू.

  • शहरात सुरक्षा वाढवण्यात आली, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com