Maharashtra Crime: महाराष्ट्र हादरला! चौथीही मुलगी झाली, बापानेच केला घात; मुलीच्या डोक्यात पाट घालून केली हत्या
महाराष्ट्र हादरवून गेला असा एक भयावह प्रकार जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मोराड गावात उघडकीस आला. जन्मदात्या पित्याने चार वर्षांच्या मुलीची इच्छा पूर्ण न झाल्याने फक्त ३ दिवसांच्या चिमुकलीची डोक्यात लाकडी पाट मारून निर्घृण हत्या केली. आरोपी पित्याला पोलिसांनी अटक केली असून, पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या क्रूर कृत्याने संपूर्ण राज्यात संताप आणि भीती निर्माण झाली आहे.

कुटुंबातील कोणीही फिर्याद दाखल करण्यास तयार नव्हते, त्यामुळे पोलिसांनी स्वतःच फिर्यादी होऊन गुन्हा नोंदवला. कसून चौकशीत कृष्णा राठोडने चौथी मुलगी झाल्यामुळे हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, सखोल तपास सुरू आहे. या घटनेमुळे मोराड गाव आणि परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांनी आरोपीला कठोरांती कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे.
या प्रकरणाने मुलींवरील भेदभाव आणि स्त्रीभ्रूणहत्या सारख्या सामाजिक समस्यांकडे पुन्हा लक्ष वेधले आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा वैयक्तिक इतिहास आणि कुटुंबातील पार्श्वभूमी तपासली जात आहे. समाजकार्यकर्ते आणि महिला संघटना या घटनेच्या निषेधार्थ आंदोलनाची तयारी करत आहेत. अशा क्रूर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.