Prashant Abitkar On Pune Case : गर्भवती महिला मृत्यूप्रकरणी मंत्री प्रशांत आबिटकरांचा संताप म्हणाले, "आरोग्य विभागाच्या वतीने पुण्यातील..."
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशाच्या अभावी गर्भवती महिलेवर उपचार न केल्यामुळे त्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहे.
हॉस्पिटलवर कारवाई करण्यात येईल आबिटकर यांचा दावा
याचपार्श्वभूमिवर बोलताना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, "दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या घटनेनंतर सर्वांच्या मनात तीव्र भावना आहेत. उपचारासाठी जे कोणी रुग्ण येतं त्यांच्यावर पहिल्यांदा उपचार करणे महत्त्वाचं असतं, मात्र जी काही घटना घडली त्याबद्दल खेद आहे. या रुग्णालयाबद्दल अत्यंत गंभीर अशा तक्रारी आल्या आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने पुण्यातील संबंधित विभागांना सूचना दिलेल्या आहेत. चौकशीदरम्यान जे काही अहवालात असेल, त्यानुसार रुग्णालयावर कारवाई करण्यात येईल. हा हॉस्पिटल बॉम्बे नर्सरी ॲक्टनुसार आणि पब्लिक ट्रस्ट अॅक्ट नुसार चालतो या दोन्ही अॅक्ट नुसार ज्या चुका झाल्या आहेत, त्यानुसार हॉस्पिटलवर कारवाई करण्यात येईल", असं प्रकाश आबिटकर म्हणाले आहेत.
सर्व हॉस्पिटलसाठी एक मार्गदर्शक सूचना
"एका बाजूला दोन बाळ जन्म घेत आहेत आणि त्याचवेळी त्यांचे आई दगावले जाते हे अत्यंत दुःखद घटना आहे या सर्वांची कायदेशीर दृष्ट्या तपासणी करून कारवाई केली जाईल. लवकरच सर्व हॉस्पिटलसाठी एक मार्गदर्शक सूचना जाहीर केली जाईल". असा दावा प्रकाश आबिटकर यांनी केला आहे.