Crime News : गर्भवती मुलीचा आईनेच  आवळला गळा, नालासोपाऱ्यामध्ये धक्कादायक घटना

Crime News : गर्भवती मुलीचा आईनेच आवळला गळा, नालासोपाऱ्यामध्ये धक्कादायक घटना

नंतर आलेल्या रिपोर्टमध्ये ही आत्महत्या नसून हत्या केल्याचे उघड झाले आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

नालासोपारा येथून ए धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका आईने आपल्या पोटच्या मुलीचाचा गळा आवळून खून केला आहे. 20 वर्षीय मुलगी गर्भवती राहिल्याने संतप्त झालेल्या आईने टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे नालासोपारा येथे शांतता पसरली आहे.

नालासोपारा येथील यशवंत गौरव परिसरात जय विजय नगरी इमारतीमध्ये राहणारी अस्मिता दुबे ही 20 वर्षीय तरुणी आई-वडील आणि लहान बहिणीबरोबर राहत होती. सुरुवातीला अस्मिताच्या आईने मुलीने गळफास लाऊन घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांना दिली. मात्र तपासादरम्यान पोलिसांना शंका निर्माण झाली. अस्मिताचा मृतदेह शवविच्छेदना पाठवण्यात आला. नंतर आलेल्या रिपोर्टमध्ये ही आत्महत्या नसून हत्या केल्याचे उघड झाले आहे. नंतर पोलिसांनी अधिक तपास केला .

या सगळ्या तपासामध्ये मृत अस्मिताच्या आईने आत्महत्येचा बनाव केल्याचे समोर आले. याबद्दल पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विशाल वळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्मिता गर्भवती असल्याचे समजताच आई ममता दुबे अधिक संतप्त झाली. तिने रागाच्या भरात अस्मिताला खूप मारहाण केली. नंतर ममताने दोरीने गळा आवळून तिची हत्या केली. यावेळी अस्मिताच्या 17 वर्षीय अल्पवयीन बहिणीने तिचे पाय धरले.दरम्यान या नंतर ममताने अस्मिताच्या हत्येचा बनाव रचला.

या प्रकरणी आता ममता दुबेवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच तिच्या अल्पवयीन बहिणीला सुधारगृहात ठेवण्यात येणार आहे. याबद्दल अधिक तपास सुरु आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com