Nagpur Crime : माओवाद्यांशी संबंध असल्याचे सांगून नागपूरमध्ये नवविवाहितेचा छळ

Nagpur Crime : हुंड्यासाठी माओवाद्यांशी संबंध सांगून नागपुरात धक्कादायक गुन्हा दाखल.
Published by :
Riddhi Vanne

नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नवविवाहितेचा हुंड्यासाठी छळ केल्याचं समोर आले आहे. लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातंच हुंड्यासाठी विवाहितेच्या माहेरच्यांचा छळ करत होते. लग्नाआधी मुलगा कमवत असून त्यांचे वार्षिक उत्पन्न 7-10 लाख रुपये सासरच्यांनी पीडित महिलेच्या माहेरच्यांना सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात पती कोणतीही नोकरी करत नसून आई वडिलांवर अवलंबून असल्याचं समजले. त्यामध्ये तो व्यसनाधीन असल्याचंही लक्षात आलं, सासरच्यांना फसवणुकीबद्दल विचारले असता विवाहितेचा हुंड्यासाठी छळ करण्यास सुरूवात केली.

नवविवाहितेला माहेरच्यांकडून 5 लाखांची मागणीदेखील करत होते. हुंडा देण्यास नकार दिल्याने आमचे माओवाद्यांशी संबंध असल्याचे सांगत पैसे न दिल्यास मुलीचे बरेवाईट झाले तर जबाबदार राहणार नाही, असं सासरच्यांनी नवविवाहितेच्या माहेरच्यांना सांगितल्याचा आरोप तिने आणि नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी भंडारा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com