Parbhani Crime | भररस्त्यात नंग्या तलावींची दहशद CCTV कैद

Parbhani Crime | भररस्त्यात नंग्या तलावींची दहशद CCTV कैद

Published by :
Published on

महानगर मुंबईत ७० ते ९० च्या दशकात चाललेला गँगवॉर हा सर्वांनाच आठवत असेल. यावर अनेक चित्रपटही निघाले. पण अनेक अॅक्शन चित्रपटाला शोभेल असा थरार परभणीत घडला. आज मुंबईत अशा क्वचितच अशा घटना ऐकायला मिळतात.

'जगात जर्मनी आणि भारतात परभणी' अशी ओळख असलेल्या परभणीतले रस्ते गावगुंडांचा अड्डा बनलेला दिसतो. गुरुवारी दुपारी परभणी शहरातील दर्गा रोडवर परिसरात दोन गटात क्षुल्लक कारणावरून मोठा राडा झाला. या राड्यात इमरान जैन नावाच्या गुंडाने बंदुकीच्यासाह्याने दोन गोळ्या दुसऱ्या गटातील युवकांवर झाडल्या.त्यानंतर काही क्षणातच दुसऱ्या गटातील ५ ते ६ जणांनी इमरान जैन यावर तलवारीने हल्ला केला.

सर्व घटना बॉलिवूडच्या चित्रपट कथेला शोभणारी होती. ही सर्व घटना CCTV मध्ये कैद झाली.या जीवघेण्या हल्ल्यात बंदुकीने गोळ्या झडणारा इमरान जैन नावाचा युवक गंभीर जखमी झाला असून जखमींवर सद्या उपचार सुरू आहे. पोलिसांनी CCTV च्या आधारे दोन युवकांना अटक केली असून इतर आरोपींच्या अटकेसाठी परभणी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com