Dahisar Crime News : दहिसरमध्ये पत्नी व अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला; पतीस अटक
दहिसर परिसरात पत्नी आणि अल्पवयीन मुलीस ब्लेडने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पतीस पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी असलेल्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनुसार, ती आणि तिची आई झोपेत असताना आरोपी पती घरात घुसला आणि ब्लेडने तिच्या गळ्यावर वार केला. त्यानंतर पत्नीच्या पोटावरही वार करत दोघींना ठार मारण्याचा प्रयत्न केला. आवाज ऐकून मदतीला आलेल्या नागरिकांनाही आरोपीने धमक्या दिल्या.
घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलिसांच्या तत्पर आणि योग्य वेळी केलेल्या कारवाईमुळे हा गंभीर गुन्हा उघडकीस आला आहे.
थोडक्यात
दहिसर परिसरात पत्नी आणि अल्पवयीन मुलीस ब्लेडने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पतीस पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादी असलेल्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनुसार, ती आणि तिची आई झोपेत असताना आरोपी पती घरात घुसला आणि ब्लेडने तिच्या गळ्यावर वार केला.
त्यानंतर पत्नीच्या पोटावरही वार करत दोघींना ठार मारण्याचा प्रयत्न केला.
आवाज ऐकून मदतीला आलेल्या नागरिकांनाही आरोपीने धमक्या दिल्या.

