Pune Crime : शालेय विद्यार्थिनींसोबत व्हॅनमध्ये अश्लील चाळे, गुन्हा दाखल

स्कूल व्हॅन चालकाविरोधात नांदेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published by :
Shamal Sawant

पुण्यामध्ये पुन्हा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील नांदेड सिटी परिसरात शालेय विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे करणाऱ्या नराधम स्कूल व्हॅन चालकाविरोधात नांदेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रसूल अत्तार असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. रसूल अत्तार नांदेड परिसरात एका नामांकित शाळेत विद्यार्थ्यांना स्कूल व्हॅन मधून घेऊन जात असे. ही स्कूल व्हॅन रस्त्यातच थांबवून विद्यार्थ्यांना अश्लील चाळे करत असल्याचे लक्षात आल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी याबाबत घरी माहिती दिली होती. त्यानंतर नागरिकांनी आरोपीला चोप देत आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिल आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com