Pune Breaking : कोंढवा गोळीबार: गणेश काळे प्रकरण; नऊ जणांवर गुन्हा दाखल
थोडक्यात
पुणे गणेश काळे हत्या प्रकरण
हत्या प्रकरणातील दुसरा व्हिडीओ समोर
गँगस्टर बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकरसह नऊ जणांवर गुन्हा दाखल
(Pune Breaking) कोंढवा परिसरात गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. गणेश काळे गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गणेश काळे हा आंदेकर टोळीतील दत्ता काळे याचा भाऊ असल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेश काळेवर सहा राऊंड फायर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून त्याच्यावर कोयत्याने देखील वार करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर गँगस्टर बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून
टोळी युद्धातूनच गणेश काळे याची हत्या झाल्याची माहिती मिळत आहे. गुन्ह्यातील आरोपी बंडू आंदेकर,कृष्णा आंदेकर,आमिर खान ,मयूर वाघमारे ,स्वराज वाडेकर ,अमन शेख ,अरबाज पटेल तर इतर दोन अल्पवयीन आरोपींची गुन्ह्यात नावे असून आज या प्रकरणातील आरोपींना दुपारी कोंढवा पोलीस कोर्टात हजर करणार आहेत.
