Sushant Singh Rajput : सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीला क्लीन चीट ; CBI च्या क्लोजर रिपोर्ट समोर
अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये आता सीबीआयने मोठा निर्णय दिला आहे. सीबीआयने कोर्टामध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल केला असून सुशांतचा मृत्यू ही आत्महत्याच असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे याप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला क्लीन चीट मिळाली आहे.
सुशांतने 2020 साली वांद्रे येथील राहत्या घरी घरी गळफास लाऊन घेऊन आत्महत्या केली होती. मात्र त्याच्या आत्महत्येवर शंका उपस्थित गेली. हा तपास सीबीआयकडे सोपवला गेला. सुशांत सिंगच्या वाडीलणी रिया चक्रवर्तीच्या विरोधात सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र सुशांतचा मृत्यू हा कोणताही कट नसल्याचा दावा आता सीबीआयने केला असून रिया चक्रवर्ती आणि इतर आरोपींना क्लीन चीट दिली आहे.
सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नेमकं काय ?
- सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली होती, त्याला आत्महत्येसाठी कोणीही जबरदस्ती केली नाही.
- रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला क्लीन चिट मिळाली.
- या प्रकरणी कोणताही गुन्हेगारी अँगल किंवा 'फाऊल प्ले' नाही.
- AIIMS फॉरेन्सिक टीमनेही हत्येची शक्यता नाकारली.
- सोशल मीडिया चॅट्स अमेरिकेत पाठवून तपास केला असून त्यामध्ये छेडछाड केल्याचा कोणताही पुरावा नाही.