फायर एस्केपच्या मार्गाने घरात घुसला...; सैफच्या घरात चोर कसा घुसला, पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
गुरुवारी रात्रीच्या सुमारास सैफ अली खानवर घरात घुसून चाकू हल्ला करण्यात आला होता. यावेळी पत्नी करीना कपूर दोन मुलं जेह आणि तैमूर घरात होते. त्याशिवाय या मुलांचा सांभाळ करणाऱ्या नॅनी सुद्धा सोबत होत्या. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याचा मुंबई पोलिसांकडून तपास सुरु आहे.
सैफ अली खान आणि करीना कपूर हे क्वाड्रूप्लेक्स घरात राहतात. म्हणजे सैफच्या फ्लॅटच्या आत चार मजले आहेत. चोराने बिल्डिंगच्या सीढ़्यांवरून वरच्या मजल्यापर्यंत पोहोचून, फायर एस्केप मार्गाचा उपयोग करून सैफच्या घरात प्रवेश केला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
चोराने आधी सैफच्या इमारतीच्या शेजारील परिसरात प्रवेश केला. त्यानंतर त्याने भिंत ओलांडून पेटफिना इमारतीच्या आत प्रवेश केला. परिसरात घुसल्यानंतर, चोराने इमारतीच्या मागील भागातून सीढ़्यांवर चढून सैफच्या घराच्या मजल्यापर्यंत पोहोचला. आणि फायर एस्केप मार्गाचा उपयोग करून सैफच्या घरात प्रवेश केला.
रिपोर्ट्सनुसार, सैफच्या घरात काम करणारी एलियामा फिलिप्स उर्फ लीमा या महिलेने रात्री सुमारे 2 वाजता चोराला पाहिले. दरम्यान या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे.
सैफ अली खानच्या घरातच्या झालेल्या चाकूहल्ल्यानंतर तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला तात्काळ वांद्रे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हल्लेखोराने चाकूचे सहा वार सैफवर केले होते. यानंतर त्याला लिलावतीमध्ये दाखल करण्यात आलं. हल्ल्यात सैफच्या मणक्यावर गंभीर दुखापत झाली. शस्त्रक्रियेत सैफच्या मणक्यातून ३ इंचाचा तुकडा काढला. तर मानेवरही जखम झाली असून प्लास्टिक सर्जरी कऱण्यात आली. यासोबत डाव्या हातावर दोन जखमा, तर उजव्या हातावर चाकूने खरचटल्याच्या दोन खुणा आहेत.