Sangli Crime News : परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडिलांकडून पोटच्या मुलीला अमानुष मारहाण; मुलीचा मृत्यू
(Sangli Crime News ) सांगलीत वडिलांकडून पोटच्या मुलीला अमानुष मारहाण करण्यात आली आणि यामध्ये मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. साधना धोंडीराम भोसले मृत मुलीचे नाव आहे. खाजगी शिकवणीत बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यानंतर झालेल्या वादातून चिडलेल्या जन्मदात्या बापानेच आपल्या लेकीला बेदम मारहाण केली.
या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला आहे. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे ही घटना घडली आहे. साधना आटपाडीत बारावीचे शिक्षण घेत होती. वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ती तयारी करत होती. तिला डॉक्टर करण्याचे कुटुंबीयांचे स्वप्न होते. यासाठी खाजगी शिकवणी लावली होती. त्या शिकवणीत सराव परीक्षा झाली आणि त्या सराव परीक्षेत तिला कमी गुण मिळाले त्यामुळे वडील धोंडीराम चिडले आणि त्यांनी मुलीला मारहाण केली.
याप्रकरणी गावातील माध्यमिक शाळेत शिक्षक असलेले तिचे वडील धोंडीराम भगवान भोसलेला पोलिसांनी अटक केली आहे.