Santosh Deshmukh Case : "हत्येच्याआधी पप्पा मला म्हणाले...", संतोष देशमुखांच्या लेकीचा जबाबात मोठा खुलासा

"हत्येच्याआधी पप्पा मला म्हणाले...", संतोष देशमुखांच्या लेकीचा जबाबात मोठा खुलासा
Published by :
Team Lokshahi

बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भातील अनेक अपडेट्स समोर येत आहेत. या प्रकरणामध्ये वाल्मीक कराडला मुख्य दोषी ठरवलं आहे. त्याच्याविरोधातील अनेक पुरावेदेखील समोर आले आहेत. त्याबद्दलची माहिती आरोपपत्रातून समोर आली आहे. मात्र अशातच आता संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखचादेखील जबाब समोर आला आहे. "हत्येच्याआधी पप्पा मला म्हणाले...", संतोष देशमुखांच्या लेकीचा जबाबात मोठा खुलासा

या जबाबामध्ये वैभवी म्हणाली की, "माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे. तसेच विष्णु चाटे आणि संतोष देशमुख यांचंदेखील बोलणं झालं. त्यावेळी भाऊ एवढ काय झालं? इतकं कशाला ताणता? लहान गोष्टीवरून जिवावर कशाला उठता? असे वडील चाटेशी बोलत होते. त्यांचा जवळपास 10 ते 12 मिनिटं सुरु होता. असं वडिलांनी मला सांगितलं".

संतोष देशमुख आणि ग्रामस्थांनी सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांना मारहाण करून हकललं त्यानंतर विष्णू चाटे याने देशमुखांना फोन केला होता. या फोननंतर देशमुख तणावामध्ये असल्याचं त्यांच्या पत्नीनेही म्हटलं होतं. ६ डिसेंबरला ही घटना झाल्यावर आरोपी त्यांच्यावर पाळत ठेवून होते. ९ डिसेंबरला देशमुखांचं अपहरण करत त्यांनी संपवलं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com