Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाची पुन्हा चौकशी करा, सतीश सालियन यांची हायकोर्टात धाव
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नव्यानं चौकशीसाठी वडील सतीश सालियन यांची हायकोर्टात याचिका, लवकरच सुनावणी अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितल आहे. दिशाचा सामुहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा आरोप करत एनआयए चौकशीची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच याप्रकरणाचा तपास समीर वानखेडेंसारख्या प्रामाणिक अधिका-याच्या देखरेखीखाली करण्याची याचिकेतून मागणी केली आहे.
मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकल्याचा दिशाच्या वडलांचा याचिकेतून आरोप केला आहे. त्यांनी आपल्याला नजरकैदेत ठेवत मांडलेले पुरावे खरे मानण्यास भाग पाडल्याचा याचिकेतून आरोप करण्यात आला आहे. याचिकेत आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोर्या यांच्यासह मुंबई पोलीसांवर याचिकेतून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे तसेच पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी दिशाच्या मृत्यूबाबत केलेल्या आरोपांत तथ्य असल्याचा याचिकेतून दावा केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
कर्नाटकच्या उडुप्पी येथील दिशा सालियन ही दिवगंत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर होती. ति अनेक जाहिरातींच्या एजन्सीसोबतही जोडली गेली होती. त्याचसोबत तिचे वरुण शर्मा, सुशांत सिंह राजपूत, भारती सिंह यांसारख्या लोकप्रिय कलाकारांसोबत कनेक्शन होते. तिचा 8 जून 2020 ला मुंबईमध्ये घराच्या बालकनीमधून खाली पडून मृत्यू झाल्याचं वक्तव्य तिच्या वडिलांनी केलं होत. हे प्रकरण भाजपचे नेते नारायण राणे आणि नितेश राणे यांनी धारेवर धरल होत त्यामुळे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे तसेच सूरज पांचोली, दिनो मोर्या यांचा ही या प्रकरणात हात असल्याचा आरोप ही केला होता. दरम्यान पोलिसांना याप्रकरणी त्यांना कोणतेच पुरावे मिळाले नाहीत.