Sayali Kabadi Death Case: सायलीला न्याय कधी?, महिला दिनी आईचा टाहो

सायली कबाडी मृत्यू प्रकरण: महिला दिनाच्या दिवशी आईचा टाहो, हुंड्यासाठी सायलीचा पतीने घेतला जीव. सायलीला न्याय मिळेल का? जाणून घ्या संपूर्ण कहाणी.
Published by :
Prachi Nate

आज जागतिक महिला दिन आहे आणि आज महिला दिन असताना अहिल्यानगरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. सध्या महिलांवर होणारे अत्याचाराच्या बातम्या सर्वांसाठीच काय नवीन नाही आहेत. दर नवीन दिवसाला एक तरी महिला अत्याचाराची बातमी समोर येते.

लहान बालिकांपासून ते वृद्ध महिलांवर देखील अत्याचार होत आहेत. असं असताना हुंड्यामुळे होणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या देखील कानावर पडत असतात. अशाच एका हुंड्यामुळे एका महिलेने आपला जीव गमावला आहे. मात्र यावेळी तिचा जीव त्याने घेतला ज्याच्यावर विश्वास ठेवून ती लग्न करून नवीन घरात गेली. ही गोष्ट सायली चंद्रकांत परब हिची आहे, सायलीच्या पतीनेच हुंड्यासाठी सायलीचा जीव घेतला.

नेमकं प्रकरण काय?

तर सायलीच्या वडिलांची सरकारी नोकरी असल्यामुळे त्यांची सतत बदली होत रहायची. त्यामुळे तिच शिक्षण कधी मुंबईत झाल तर कधी पुण्यात झाल. तिच पुढचं डॉक्टरचं शिक्षण घेण्यासाठी सायली बंगळूरुला गेली. तिथे तिची ओळख सुशील कबाडी या इस्मानाशी झाली. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं. 2013 मध्ये कोकणातील या चेडूची लग्नगाठ अहिल्यानगरच्या सुशील कबाडीशी बांधली गेली.

लग्नाच्यावेळी सुशीलच्या घरच्यांकडून हुंड्याची मागणी करण्यात आली होती मात्र त्यावेळेस सायलीची आई कर्करोगाला सामोरी जात होती. त्यामुळे तिच्या वडिलांनी त्यांना काही काळाने हुंडा पुरवला. अस असताना हसती खेळती राहणारी सायली 7 फेब्रुवारीला मात्र कायमची शांत झाली. सायली सोबत नेमक असं काय घडल ? हे सांगताना सायलीची आई गहिवरली देखीलमहिला दिनी आईचा टाहो फुटला. काय म्हणाली सायलीची आई जाणून घेण्यासाठी पाहा लोकशाही मराठीची बातमी.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com