Pune Crime : पुण्यात खळबळजनक प्रकार; महिलेला खाणीत फेकून हत्या

Pune Crime : पुण्यात खळबळजनक प्रकार; महिलेला खाणीत फेकून हत्या

Pune शहरात आणखी एक गंभीर घटना समोर आली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिचा खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Pune शहरात आणखी एक गंभीर घटना समोर आली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिचा खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणातील संशयित हे पूर्वीपासून गुन्हेगारी नोंद असलेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

माहितीनुसार, महिलेला जबरदस्तीने रिक्षातून एका एकांत भागात नेण्यात आले. तेथे तिच्यावर मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिला दगडाच्या खाणीत ढकलल्याचा आरोप आहे. लैंगिक अत्याचाराचाही संशय व्यक्त केला जात असून वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे.

सुरुवातीला हा प्रकार अपघात वाटत होता; मात्र तपासादरम्यान धक्कादायक बाबी समोर आल्या. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत संशयितांना ताब्यात घेतले. सीसीटीव्हीपासून बचाव करण्यासाठी वाहनात बदल केल्याची माहितीही पुढे आली आहे. परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com