Maharashtra Crime
Maharashtra Crime

Maharashtra Crime: नवरा उशिरा घरी आल्याचा राग, बळी ठरली निष्पाप चिमुकली; लातूरमध्ये धक्कादायक घटना

Latur Child Crime: लातूरमध्ये माणुसकी हादरवणारी घटना समोर आली आहे. पती उशिरा घरी आल्याच्या रागातून आईने दीड वर्षांच्या निष्पाप चिमुकलीची क्रूर हत्या केली.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

लातूर शहरातील एमआयडीसी श्यामनगर भागात एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली आहे. एका आईने आपल्या पोटच्या दीड वर्षांच्या मुलीची क्रूरपणे हत्या केली आहे. पतीला कामावरून घरी येण्यास उशीर झाल्याने संतापून घडलेल्या या घटनेने परिसरसह संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी आईला तात्काळ अटक केली असून, तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत चिमुकलीचे वडील विक्रम जगन्नाथ चौगुले (३४) हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. सोमवारी पहाटी कामाला निघाले असताना त्यांना घरी परतण्यास काहीसा उशीर झाला. यावरून त्यांची पत्नी अश्विनी विक्रम चौगुले (३०) च्या मनात अतिशय तीव्र राग निर्माण झाला. संतापलेल्या अश्विनीने घरातील धारधार चाकू उपसून आपल्या निष्पाप दीड वर्षांच्या मुलीवर अत्यंत क्रूरतेने सपासप वार केले. तिने मुलीच्या तोंडावर, पोटावर, छातीवर, कमरेवर, डोक्यात आणि गुप्तांगावर वार केले, ज्यामुळे चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला.

लातूरमधील नवोदय शाळेत शाळकऱ्या मुलीची आत्महत्या; राज्य सरकारने SIT नेमली

लातूर जिल्ह्यातील आणखी एक घटना घडली असून, जवाहर नवोदय विद्यालयातील सहावीच्या शाळकरी विद्यार्थिनी अनुष्का पाटोळेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिचा मृतदेह शाळेत सापडला असून, या घटनेने शैक्षणिक वातावरणात हाहाकार उडाला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप निश्चित झाले नसले तरी राज्य सरकारने या प्रकरणाचा गंभीरतेने तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) नेमले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अनुष्का पाटोळे ही सहाव्या वर्गातील हुशार विद्यार्थिनी होती. शाळेत शिकत असताना तिने अचानक गळफास घेतला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने नांदेड जिल्ह्यातील अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली SIT ची स्थापना केली आहे. ही समिती शाळेच्या वातावरण, विद्यार्थ्यांवरील दबाव, इतर संभाव्य कारणांचा सखोल अभ्यास करणार आहे. लातूरमधील या दोन घटनांमुळे स्थानिक प्रशासन आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनांमुळे लातूर शहर आणि जिल्ह्यात मानवी मूल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पोलिसांकडून दोन्ही प्रकरणांमध्ये सतर्क तपास सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com