Shocking News: बापरे...! ट्रिपल मर्डर, मुलानेच पित्यासह कुंटुबांच्या ३ लोकांना मारले; मृतदेह विहरीत फेकला
उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील मौयमा पोलीस स्टेशन परिसरात खळबळजनक घटना घडली. एका तरुणाने स्वतःच्या वडील, २१ वर्षीय बहिण आणि १४ वर्षीय भाची यांची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकले. पोलिसांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले. आरोपी मुलगा मुकेश सध्या फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
माहितीनुसार, हे तिघे २ जानेवारीपासून बेपत्ता होते. कुटुंबाने मौयमा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. सोमवारी विहिरीत मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. आरोपी मुकेशने त्यांचे अपहरण करून हत्या केल्या असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला असून, खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस सूत्रांनी सांगितले की, मुकेश मानसिकदृष्ट्या आजारी होता आणि वडिलांशी वारंवार भांडतो. हत्येच्या तीन दिवस आधी त्याने धाकट्या भावाची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्या हल्ल्यानंतर घरात कौटुंबिक कलह वाढला.
गेल्या शुक्रवारी रात्री तिघे गायब झाल्यावर कुटुंबाने पोलिसांना कळवले. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही, पण कौटुंबिक वाद कारणीभूत असल्याचे दिसते. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिस पथक मुकेशचा शोध घेत आहे. कुटुंबातील सदस्यांची चौकशी सुरू असून, तपास वेगाने पुढे सरकत आहे.
