Thane : ठाण्यामध्ये तब्बल 800 बॉक्स दारु जप्त ; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Thane : ठाण्यामध्ये तब्बल 800 बॉक्स दारु जप्त ; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

मुंब्रा रोडवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; वाहन चालक अटकेत
Published by :
Shamal Sawant
Published on

मुंब्रा रोड जवळ गोवा राज्यात निर्मित केलेल्या भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने काल कारवाई केली. परराज्यातील भारतीय बनावट विदेशी मद्याच्या (गोवा राज्यात निर्मित) एकूण 800 बॉक्स तसेच ६३ लाख ९८ हजार ४०० रुपयांचा दारूबंदी गुन्ह्याअंतर्गत जप्त केले आहे. ठाणे येथील राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक यांच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. ठाणे येथील राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक यांच्या भरारी पथकाने परराज्यातील भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य (गोवा राज्यात निर्मित) वाहतुकीवर कारवाई केली आहे

खारेगाव परिसरातील अमित गार्डनजवळ 16 मे 2025 रोजी कारवाई केली. टेम्पो क्र. एम एच 05 एएम 1265 या वाहनावर संशय आल्याने वाहनावर छापा घालण्यात आला. त्यामध्ये परराज्यातील भारतीय बनावट विदेशी मद्याच्या (गोवा राज्यात निर्मित) एकूण 800 बॉक्स दारूबंदी गुन्ह्याअंतर्गत जप्त केले आहे.या कारवाईमध्ये वाहनासह एकूण 63 लाख 98 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी नामे जुल्फेकार ताजअली चौधरी (वाहनचालक) यास अटक केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ.राजेश देशमुख आयुक्त, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, कोकण विभागीय उपआयुक्त प्रदिप पवार, अधीक्षक प्रविण तांबे, उपअधीक्षक वैद्य, पोकळे, ए.डी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास अधिक्षक प्रविण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महेश प्रकाश धनशेट्टी हे करीत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com