अभ्यास करत नाही म्हणून मुलाचा गळा दाबला, भिंतीवर डोकं आपटलं;  चिमुकल्याचा जागीच मृत्यू

अभ्यास करत नाही म्हणून मुलाचा गळा दाबला, भिंतीवर डोकं आपटलं; चिमुकल्याचा जागीच मृत्यू

बारामतीत मुलाच्या अभ्यासावरून वडिलांनी रागाच्या भरात केलेल्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू. पोलिसांनी खूनाचा तपास करत आरोपींना अटक केली.
Published by :
Prachi Nate
Published on

बारामती तालुक्यातील होळ येथील पियुष विजय भंडलकर या नऊ वर्षीय बालकाचा त्याच्या वडिलांनी मुलगा अभ्यास करत नाही, म्हणून रागाच्या भरात भिंतीवर डोकं आपटून आणि गळा दाबून त्याचा खून केला आहे. 14 जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता राहत्या घरी ही घटना घडल्याची माहिती आहे. त्यानंतर हा सर्व प्रकार लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वडगाव निंबाळकर पोलिसांनी या खुनाचं रहस्य उलघडले. वडील विजय भंडलकर, पियुषची आजी शालन भंडलकर आणि संतोष भंडलकर या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

आजीकडून घटना लपवण्याचा प्रयत्न,दिली खोटी माहिती

वडील विजय भंडलकर यांनी मुलगा पियुष याला, तू अभ्यास करत नाही, सारखा बाहेर खेळत असतो, तू तुझ्या आईच्या वळणावर जावून माझी इज्जत घालवणारा दिसत आहे, असं म्हणत त्याला हाताने मारहाण केली. राग अनावर झाला अन् त्यांनी त्याचा गळा दाबून त्याला भिंतीवर आपटले यात त्याचा मृत्य झाला. पियुषची आजी हे सर्व पाहत होती, पण तिने मुलगा विजयला अडवलं नाही. त्यानंतर विजयच्या सांगण्याप्रमाणे पियुष हा चक्कर येवून पडला आहे, अशी खोटी माहितीही तिने दिली.

मुलगा चक्कर येवून पडल्याचा बनाव....

संतोष भंडलकर याने डॉ. भट्टड यांच्या दवाखान्यात पियुषला नेल्यानंतर तेथे विजय याच्या सांगण्यावरून पियुष चक्कर येवून पडल्याची खोटी माहिती दिली. डॉक्टरांनी पियुषला होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेवून जाण्याचा सल्ला दिला. मात्र त्याचे वडिल त्याला तेथे घेऊन गेले नाही.

तसेच गावातील पोलीस पाटील आणि इतर कोणालाही काहीही न सांगता, नातेवाईकांना बोलावून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने पियुषचे शवविच्छेदन न करता थेट अत्यंविधीची तयारी केली. पोलिसांना एका माणसाकडून ही माहिती समजताच पोलिसांनी अंत्यविधी थांबवत पियुष याचा मृतदेह तपासणीसाठी बारामतीला नेला आणि त्यानंतर तपासात बापानेच पियुषची हत्या केल्याचं समोर आलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com