WTC India Schedule: 2025-2027 टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चे वेळापत्रक जाहीर
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चौथ्या पर्वाला 17 जून पासून सुरवात होणार आहे. 2025-2027 टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारतीय संघ या काळात एकूण 18 कसोटी सामने खेळणार आहे श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश मालिकेतून याची सुरुवात होणार.
सर्वच संघ ह्या मालिका खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे. आयसीसी डब्ल्यूटीसी 2025-2027 मध्ये एकुण 69 मालिका आणि लिग स्टेजमध्ये 71 सामने खेळले जाणार आहेत. ज्यामध्ये पॉइंट टेबल वरील रँकिंग नुसार अव्वल दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 20 जूनपासून होणार आहे.
या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि न्यूझीलंड हे देश सहभागी होणार आहेत. शुभमन गिल च्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आपल्या खेळाचे प्रदर्शन करणार असून या स्पर्धेची सुरुवात इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेने होणार आहे. भारतीय संघाने यापूर्वी अंतिम फेरीत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करला आहे.
आता या मालिकेमध्ये भारतीय संघाचा कस लागणार आहे. पहिला कसोटी सामना लीड्सवर होणार आहे.भारतीय संघ एकूण 18 कसोटी सामने खेळणार असून इंग्लंडविरुद्ध 5, वेस्ट इंडिजविरुद्ध 2, दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 2, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5, श्रीलंकेविरुद्ध 2 आणि न्यूझीलंडविरुद्ध 2 सामने खेळले जाणार आहेत. ऑस्ट्रेलिया , दक्षिण आफ्रिका आणि वेस्टइंडीज चे सामने हे भारतामध्ये खेळवले जाणार असून श्रीलंकेचे सामने आणि न्यूझीलंड चे 2 सामने हे त्या त्या देशांमध्ये खेळवले जाणार आहेत.
यंदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये फायनल पर्यंत जाण्यासाठी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला हरवणे हे मोठं आव्हान असणार आहे. यामध्ये यश मिळालं तर भारता विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकणार आहे. भारत इंग्लंडविरुद्ध पहिली कसोटी 20 जून पासून सुरुवात होऊन 4 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे . भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिका 2 ऑक्टोबर पासून 14 ऑक्टोबर पर्यंत होणार आहे.