Vaishnavi Hagawane : धक्कादायक! नणंद तोडांवर थुंकली, नवरा मारत मारत घरी घेऊन आला ; नेमकं काय घडलं वैष्णवीसोबत?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुळशी तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. हुंड्याच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचलेले अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. हुंड्याच्या मागणीसाठी वैष्णवीचे सासरच्या लोकांनी तिच्या प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ केला असा आरोप मृतक वैष्णवीच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे.
वैष्णवीच्या कुटुंबीयांच्या प्रतिक्रिया
बाळाला 6-7 महिने झाल्यावर पती शंशाकने वैष्णवीला मारायला सुरुवात केली. नंनदेने तिला मारली, तिच्या तोंडावर थूंकली वैष्णवीला मारत मारत घरी आणली. 1 लाख 20 हजारांचे घडळ्याची मागणी केली होती. सहा महिन्यानंतर मारहाण करण्यास सुरुवात केली, वैष्णवीला विचारले असता वैष्णवी म्हणायची, "मामा माझी चूक झाली, मी काय करु".
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील पिंपरी येथील वैष्णवी हगवणे नावाच्या विवाहित माहिलेचा मृत्यू झाला. 16 मे 2025 रोजी तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. मात्र तिने आत्महत्या केली नसून तिचा खून करण्यात आला आहे, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. पती, सासू-सासरे तसेच नंदेकडून तिचा छळ केला जायचा, असा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे वैष्णवी आणि तिचा नवरा शशांक या दोघांचा प्रेमविवाह होता. घरच्यांच्या विरुद्ध जाऊन वैष्णवीने शंशाकसोबत लग्न केले होते. मात्र शंशाक तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. वैष्णवीच्या घराच्यांनी तिच्या लग्नात हुंडा म्हणून 51 तोळे सोनं दिले होते. त्यासोबतच महागडी फॉर्च्यूनर कार सुद्धा येण्याची आली होती. याबरोबरच महागडी भांडी, लग्नानंतर वैष्णवी माहेरी जायची, त्यावेळेस तिला चांदीची मूर्ती, दीड लाखांचा मोबाईल अशा अनेक गोष्टी माहेरच्यांनी तिला दिल्या होत्या. तरीदेखील सासरची मंडळी तिचा छळ करत होती असा आरोप करण्यात आला आहे.