Crime
Beed Crime : बीडमध्ये नक्की चाललंय काय?, आष्टीमध्ये मालकाने केली युवकाची हत्या
बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरणानंतर आणखी एक हत्या, आष्टीत मालकाने केली युवकाची हत्या
बीड जिल्हामध्ये आधीच संतोष देशमुख प्रकरण ताजे असताना आता आष्टी तालुक्यात एका तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. पिंपरी घुमरी येथे विकास बनसोडे नावाच्या तरुणाचा खून मालकाने केल्याचा आरोप विकासाचे नातेवाईक करत आहे. आरोपी बाबासाहेब क्षिरसागर यांच्याकडे विकास कामाला होता. गेल्या दोन दिवसांपूर्वी त्याला बांधून मारहाण केली जात होती. त्याच्या घराच्यांना फोन करुन 'तुमच्या मुलाला घेऊन जा नाहीतर आम्ही मारून टाकू', अशी धमकी दिली. धमकी मिळताच घराच्यांनी तात्काळ कडा आरोग्य केंद्र रुग्णालय गाठले. परंतु तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. मृत विकासच्या दंडाला मारहाण करण्यात आली होती. तसेच त्याच्या अंगावर अनेक जखमा असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांकडून मिळत आहे. दरम्यान पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहे.