पुण्यात प्रेमप्रकरणातून प्रेयसीची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये उलगडलं मृत्यूचं गूढ

पुण्यात प्रेमप्रकरणातून प्रेयसीची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये उलगडलं मृत्यूचं गूढ

Published by :
Published on

पुण्यातील फुरसुंगी परिसरात २३ वर्षांच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. प्रेयसीला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली. संबंधित प्रेयसी मृतावस्थेत सापडल्यानंतर तीन दिवसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली.

फुरसुंगीतील खंडोबाची माळ परिसरात २२ वर्षांची तरुणी घरामध्येच मृतावस्थेत आढळली. तिचे शेतकरी वडील घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. यामध्ये आत्महत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली.

सुसाईड नोटमुळे प्रियकराला बेड्या?

पुणे पोलिसांना पंचनाम्यादरम्यान मृताजवळ सुसाईड नोट सापडली. हे पत्र मृत तरुणीने लिहिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या पत्रात तरुणीने एक्स – बॉयफ्रेंड आणि त्याच्या कुटुंबीयांवर आरोप केले होते. या पुराव्यांमुळे पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा हडपसर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com