शिव ठाकरेकडे इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून चाहतीने केली विचित्र मागणी; म्हणाली...

शिव ठाकरेकडे इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून चाहतीने केली विचित्र मागणी; म्हणाली...

बिग बॉस १६’ या रिअॅलिटी शो चांगलाच चर्चेत आला आहे.

बिग बॉस १६’ या रिअॅलिटी शो चांगलाच चर्चेत आला आहे. मराठमोळ्या शिव ठाकरेने या शोमधून सगळ्यांची मनं जिंकली आहेत. रॅपर एमसी स्टॅन व शिव ठाकरे यांच्यात ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीसाठी चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. नुकतेच त्याने एक इन्स्टाग्राम लाईव्ह सेशन घेतले ज्यात त्याने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

या इन्स्टाग्राम लाईव्हच्या दरम्यान एका चाहतीने त्याला प्रश्न विचारला की “मला बॉयफ्रेंड मिळवून दे” अशी मागणी केली. तिची ही मागणी ऐकूण शिवला काय उत्तर द्यावे हे सुचेनासे झाले. तो उत्तर देत म्हणाली की, मी हे नाही करू शकत.

मराठमोळ्या शिवचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. ‘बिग बॉस’नंतर अमरावतीत चाहत्यांकडून त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com