अभिनेता अक्षय कुमारने मिसळ पाववर मारला ताव; व्हिडिओ व्हायरल

अभिनेता अक्षय कुमारने मिसळ पाववर मारला ताव; व्हिडिओ व्हायरल

अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या अभिनयाने आणि स्टंटने सर्वांचेच लक्ष वेधत असतो. सोशल मिडियावर अक्षय आपल्याला जास्त सक्रिय असलेला पाहायला मिळतो. नेहमीच काहीना काही कारणाने तो चर्चेत असतो.

अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या अभिनयाने आणि स्टंटने सर्वांचेच लक्ष वेधत असतो. सोशल मिडियावर अक्षय आपल्याला जास्त सक्रिय असलेला पाहायला मिळतो. नेहमीच काहीना काही कारणाने तो चर्चेत असतो. आतासुद्धा तो एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे ते म्हणजे पुण्यातील पुण्यातील ‘श्रीमंत मिसळ आणि बरंच काही’ येथे रक्षाबंधनच्या संपूर्ण टीमने मिसळ पाववर ताव मारला. त्याचा मिसळ पाव खातानाचा व्हिडीओ ‘इन्स्टंट बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अक्षय कुमारने मिसळ खातानाचा फोटो त्याच्या सोशल मिडियावर शेअर केला आहे. या फोटो शेअर करत त्याने ‘प्रत्येक पुणेकराची जान आणि शान, मिसळपाव! हृद्यानंतर आता आमचे पोटही पूर्णपणे भरले आहे. श्रीमंत मिसळ आणि बरंच काहीचे धन्यवाद. खूप छान’, असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे.

अक्षय कुमार त्याचा आगामी चित्रपट ‘रक्षाबंधन’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणाच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रमोशनसाठी या चित्रपटाची टीम पुण्यात गेली असताना त्यांनी या मिसळ पावची चव चाखली. या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेता अक्षय कुमारने मिसळ पाववर मारला ताव; व्हिडिओ व्हायरल
Akshay Kumar: अक्षय कुमार ठरला बॉलीवूडमधील सर्वात मोठा टॅक्स भरणारा अभिनेता
Lokshahi
www.lokshahi.com