मला पुरुषाची गरज नाही म्हणत स्वतःशीच लग्न करणारी अभिनेत्री गरोदर? फोटो केला शेअर

मला पुरुषाची गरज नाही म्हणत स्वतःशीच लग्न करणारी अभिनेत्री गरोदर? फोटो केला शेअर

अभिनेत्री कनिष्का सोनी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘दिया और बाती हम’ या मालिकेतून घराघरात पोहचली.

अभिनेत्री कनिष्का सोनी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘दिया और बाती हम’ या मालिकेतून घराघरात पोहचली. या अभिनेत्रीने काही महिन्यांपूर्वी स्वत:शीच लग्न केलं होतं. लग्न करण्यासाठी मला पुरुषाची गरज नाही असं म्हणत तिने स्वत:शी लग्न केलं. मात्र आता ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.

कनिष्का सोनीने तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. सध्या कनिष्का भारतात नव्हे तर न्युयॉर्कमध्ये राहते. तीने सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली की, “मी स्वतःशीच लग्न केलं म्हणून मी स्वतःच गरोदर आहे असं नाही. हे फक्त पिझ्झा व बर्गरचा परिणाम आहे. हे सगळे पदार्थ खाऊन माझं वजन वाढलं आहे. पण हे पदार्थ माझ्या आवडीचे आहेत.” वाढलेलं पोट पाहून गरोदर असल्याच्या अफवा पसरू नये असे लिहिले आहे. या पोस्टबरोबर तिने तिचे काही फोटोही शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचं पोट वाढलेलं दिसत आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com