Neelu Kohli : अभिनेत्री निलू कोहली यांच्या पतीचे निधन, बाथरूममध्ये सापडला मृतदेह
Admin

Neelu Kohli : अभिनेत्री निलू कोहली यांच्या पतीचे निधन, बाथरूममध्ये सापडला मृतदेह

प्रसिद्ध अभिनेत्री नीलू कोहलीचे पती हरमिंदर सिंग यांचे शुक्रवारी निधन झाले.
Published by :
Siddhi Naringrekar

प्रसिद्ध अभिनेत्री नीलू कोहलीचे पती हरमिंदर सिंग यांचे शुक्रवारी निधन झाले. नीलूचे पती हरमिंदर पूर्णपणे निरोगी होते. शुक्रवारी दुपारी ते गुरुद्वारातही गेले. तेथून परतल्यानंतर ते बाथरूममध्ये गेले आणि तिथेच पडले. त्यावेळी घरात एकच मदतनीस हजर होता.

नोकरच्या लक्षात येताच त्याने बाथरूम मध्ये धाव घेतली तेव्हा हरमिंदर बेशुद्धावस्थेत पडले होते. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले परंतु तिथे गेल्यावर डॉक्टरांनी हरमिंदर कोहली मृत झाल्याचे घोषित केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com