अभिनेत्री नोरा फतेही ईडीच्या रडारवर; चौकशीसाठी कार्यालयात हजर

अभिनेत्री नोरा फतेही ईडीच्या रडारवर; चौकशीसाठी कार्यालयात हजर

Published by :

बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यांगणा आणि अभिनेत्री नोरा फतेहीला ईडी म्हणजेच, अंमलबजावणी संचलनालयानं नोटीस बजावली आहे. त्यात नोराला दिल्ली येथील ईडीच्या कार्यालयात आज चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. यासोबतच लोकप्रिय अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिलादेखील अंमलबजावणी संचालनालयातर्फे समन्स बजावण्यात आले आहेत. जॅकलिनला यापूर्वीही चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं.

नोराला २०० कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाकडून समन्स बजावण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण दिल्लीतील तिहार तुरुंगात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखर याने केलेल्या २०० कोटींच्या घोट्याळ्याशी संबंधित आहे.

सुकेशने याप्रकरणात नोराची देखील फसवणूक केली होती. त्यामुळे तिला चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. तर जॅकलिनला १५ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालय अशा व्यक्तींची चौकशी करत आहे जे या प्रकरणाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या जोडले गेले आहेत.

आरोपी सुकेश याने फसवणूक करून मिळवलेले पैसे त्याने परदेशातील बँकेत ठेवल्याचा अंमलबजावणी संचालनालयाला संशय आहे. लाचखोरी आणि फसवणूक अशा २१ आरोपांसाठी सुकेश याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या माहितीनुसार, बॉलिवूडमधील अनेक कलाकार या सुकेशसोबत जोडलेले आहेत.

त्यामुळे अंमलबजावणी संचालनालय त्यांना समन्स पाठवत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने सुकेश याच्या चेन्नईमधील बंगल्यावर धाड टाकली होती. तेव्हा त्याच्या बंगल्यामधून ८२ लाख रुपये , दोन तोळे सोनं आणि १६ महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्या होत्या. सुकेशने जॅकलिन प्रमाणे नोराला देखील त्याच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे नोराला समन्स बजावण्यात आले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com