‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीची बिग बॉसच्या घरात होणार वाइल्ड कार्ड एंट्री

‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीची बिग बॉसच्या घरात होणार वाइल्ड कार्ड एंट्री

बिग बॉसच्या या सिझनमध्ये रोज नवनवीन वाद आपल्याला पाहायला मिळतात. यातच आता ‘बिग बॉस’ संदर्भातील एक माहिती समोर येत आहे.

‘बिग बॉस’ हिंदीचं १६वं पर्व चांगलेच लोकप्रिय ठरते आहे. बिग बॉसच्या या सिझनमध्ये रोज नवनवीन वाद आपल्याला पाहायला मिळतात. यातच आता ‘बिग बॉस’ संदर्भातील एक माहिती समोर येत आहे. ती म्हणजे या घरात एका नव्या सदस्याची वाइल्ड कार्ड एंट्री होणार आहे.

ही वाइल्ड कार्ड एंट्री कोणाची असेल ती व्यक्ती कोण असेल हे पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आणि बिग बॉस OTT फेम रिद्धिमा पंडित ‘बिग बॉस १६’मध्ये वाईल्ड कार्ड म्हणून प्रवेश करणार आहे.

रिद्धिमा पंडितने ‘बहू हमारी रजनीकांत’ या मालिकेतून आपल्या करिअरला सुरुवात केली. यानंतर रिद्धिमाने ‘यो की हुआ ब्रो’, ‘आय एम बिकॉज ऑफ अस’, ‘हैवान द मॉनस्टर’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com