अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे मराठी चित्रपटसृष्टीत कमबॅक

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे मराठी चित्रपटसृष्टीत कमबॅक

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांच्या मनावर चांगलेच राज्य केलं आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांच्या मनावर चांगलेच राज्य केलं आहे. हिंदी चित्रपटांसोबत तिने मराठी चित्रपटामंध्ये देखिल काम केलं आहे. आता पुन्हा एकदा ती मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘ती मी नव्हेच’ या चित्रपटातून उर्मिला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परितोष पेंटर यांच्या लेखनीतून आलेला हा चित्रपटात उर्मिलासोबत श्रेयस तळपदे, निनिद कामत या कलाकारांचाही सहभाग असणार आहे.

Admin

या चित्रपटाविषयी बोलताना उर्मिला म्हणाली की, “चित्रपटाची कथा ऐकताच क्षणी मला भावली. यासाठी मी पारितोषला नकार देऊच शकले नसते. ‘ती मी नव्हेच’च्या माध्यमातून पारितोष सोबत काम करण्याचा आनंद तर आहेच शिवाय मराठी चित्रपटाद्वारे आणि श्रेयस तळपदे सारख्या सहकलाकारासोबत काम करायला मिळत असल्याने हा आनंद द्विगुणीत झाला आहे.” असे तिने सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com