अजय-अतुलच्या संगीताची जादू! आदिपुरुषचे मंत्रमुग्ध करणारे पहिले गाणे रिलीज

अजय-अतुलच्या संगीताची जादू! आदिपुरुषचे मंत्रमुग्ध करणारे पहिले गाणे रिलीज

जय श्री राम हे गाणे आदिपुरुषच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाउंटवर रिलीज करण्यात आले आहे.

सुप्रसिद्ध जोडी अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेले आदिपुरुष चित्रपटातील 'जय श्री राम' गाणे झाले आहे. या गाण्याने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला असून पुन्हा एकदा अजय-अतुलच्या जोडीच्या जादूने देशातच नव्हे तर जगभरात आपला डंका वाजविला आहे. जय श्री राम हे गाणे आदिपुरुषच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाउंटवर रिलीज करण्यात आले आहे.

हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये जय श्री राम गाण्याचा बहुप्रतिक्षित टीझर रिलीज केल्यानंतर चाहते पूर्ण गाण्याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हे गाणे ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाउंटवर रिलीज करण्यात आले आहे. यासोबतच, मंत्रो की शक्ति का सार, भक्तों की भक्ति का सार, श्री राम का नाम है अपरंपार, असे कॅप्शन दिले आहे.

'जय श्री राम' या गाण्याचे बोल मनोज मुंतशिर यांनी लिहिले आहेत. तर, संगीतकार जोडी अजय-अतुल यांच्यासह ३० हून अधिक संगीतकारांनी या गाण्यावर सादरीकरण केले. नाशिकच्या ढोलाच्या तालापासून ते 'जय श्री राम'च्या जयघोषापर्यंत हा एक अनोखा प्रयोग केला आहे. या गाण्याने खरंच प्रेश्रकांच्या अंगावर काटा आणला. या गाण्याचे सुर मंत्रमुग्ध करणारे आहे.

ओम राऊत दिग्दर्शित आणि भूषण कुमार निर्मित, आदिपुरुष हा एक भव्य चित्रपट आहे. यामध्ये प्रभास, सैफ अली खान, क्रिती सॅनॉन, सनी सिंग आणि देवदत्त नागे आणि इतर अनेक प्रतिभावान कलाकार आहेत. 16 जून 2023 रोजी हा चित्रपट जगभरातील स्क्रिन्सवर प्रदर्शित केला जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com