Ajay Devgan Surprise In Iffi
Ajay Devgan Surprise In IffiTeam Lokshahi

अजय देवगणने त्याच्या चाहत्यांना दिलं 'हे' खास सरप्राईज!

अजय देवगणने त्याच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज दिलं, 'दृश्यम'च्या पहिल्या भागाच्या स्पेशल स्क्रीनिंगमध्ये तो चाहत्यांना भेटला.

अजय देवगणने त्याच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज दिलं, 'दृश्यम'च्या पहिल्या भागाच्या स्पेशल स्क्रीनिंगमध्ये तो चाहत्यांना भेटला. त्याच्या या भेटीने चाहते भारावून गेल्याचं दिसून आले. शो सुरू झाला आणि अचानक अजय देवगणने थिएटर एंट्री केली आणि एकच जल्लोष झाला.

अभिनेता अजय देवगणचा 'दृश्यम 2' हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे. 2 आणि 3 ऑक्टोबरला काय झालंय माहिती आहे ना? विजय साळगांवकर पुन्हा येतोय त्याच्या कुटुंबासोबत,असं म्हणत या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण केली जात आहे. या दोन दिवसांत नक्की काय झालं होतं, याचं उत्तर आता 'दृश्यम 2' मध्ये प्रेक्षकांना मिळलं आहे.

या चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त श्रिया सरन, तब्बू, इशिता दत्ता, रजत कपूर आणि मृणाल जाधव दिसणार आहेत. हा चित्रपट आज सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com