‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्यावेळी घोड्यावरून एन्ट्री घेताना खासदार अमोल कोल्हे जखमी
Admin

‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्यावेळी घोड्यावरून एन्ट्री घेताना खासदार अमोल कोल्हे जखमी

अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्यावेळी घोड्यावरून एन्ट्री घेताना जखमी झाले आहेत.

अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्यावेळी घोड्यावरून एन्ट्री घेताना जखमी झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा स्थापना दिन असल्याने आजचा ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचा कराडमधील प्रयोग होणार असून उर्वरित दोन्ही प्रयोग रद्द करण्यात आले आहेत.

त्यांच्या पाठीच्या मणक्याला दुखापत झाली आहे. घोड्यावरुन एन्ट्री घेत असताना घोड्याचा मागील पाय अचानक दुमडला आणि त्यामुळे पाठीला जर्क बसून त्यांच्या मणक्याला दुखापत झाली. एवढे होऊनही त्यांनी प्रयोग न थांबवता तो पूर्ण केला.

त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com