नाशिकच्या हॉटेलमध्ये जाऊन स्वतः जिलेबी बनवायला लागले अमोल कोल्हे, पाहा व्हिडीओ
Admin

नाशिकच्या हॉटेलमध्ये जाऊन स्वतः जिलेबी बनवायला लागले अमोल कोल्हे, पाहा व्हिडीओ

अभिनेते अमोल कोल्हे यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच जागा निर्माण केली आहे.

अभिनेते अमोल कोल्हे यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच जागा निर्माण केली आहे. अमोल कोल्हे व प्राजक्ता गायकवाड ऐतिहासिक नाटकामधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या नाटकाचे प्रयोग लवकरच सुरू होणार आहेत. ‘शिवपुत्र संभाजी’ असं या नाटकाचं नाव आहे. यासाठी अमोल कोल्हे नाशिकमध्ये आले होते.

नाशिकमधील साधना मिसळला कोल्हे यांनी भेट दिली. तिथे जाऊन स्वतः त्यांनी जिलेबी देखिल बनवली. त्यांचा हा जिलेबी बनवतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या सोशल मिडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले की, “२१ ते २६ जानेवारी नाशिकमध्ये शिवपुत्र संभाजी महानाट्य, मोदी मैदान (केला मैदान) साधुग्राम तपोवन, नाशिक येथे होणार आहे. त्यानिमित्ताने नाशिकला जाणं झालं तेव्हा नाशिक स्पेशल साधना मिसळला भेट देण्याचा योग आला.”

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com