अनुष्का विराट कोहलीसोबत 'महाकाल'च्या चरणी लीन

अनुष्का विराट कोहलीसोबत 'महाकाल'च्या चरणी लीन

अनुष्का-विराटचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने नुकतेच भारतीय क्रिकेटपटू पती विराट कोहलीसोबत उज्जैनच्या महाकालेश्वरचे दर्शन घेतले आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा लूक चाहत्यांची मनं जिंकत आहे. त्याचबरोबर या जोडप्याला एकत्र पाहून चाहतेही प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

अनुष्का शर्मा व विराट कोहली उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात पोहोचले आहेत. महाकालेश्वरच्या पूजेदरम्यान, अनुष्का लाईट पिंक कलरची साडी घातली असून कपाळावर भस्म लावले आहे. तर, विराटने धोती घातली आहे. हे दोघेही इतर भाविकांसह महाकालेश्वर मंदिरात बसलेले आहेत. यादरम्यान दोघेही श्रद्धेने तल्लीन झालेले दिसतात. त्यांचा साधेपणा चाहत्यांच्या मनाला चांगलाच भावला आहे.

तत्पुर्वी, अनुष्का शर्मा व विराट कोहली धार्मिक स्थळी जाण्याची ही पहिलीच वेळश नाही. यापुर्वीही, अनुष्का, विराट आणि मुलगी वामिकासह ऋषिकेशमधील एका आश्रमात गेले होते. याचे फोटो अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते.

दरम्यान, विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरा कसोटी सामना खेळण्यासाठी इंदूरमध्ये होता. हा सामना तीन दिवसांत संपला. तर, अनुष्का नेटफ्लिक्स चित्रपट चकडा एक्सप्रेसमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com