आशा भोसलेंनी स्वत:च्या हॉटेलमध्ये बनवली दम बिर्याणी; पाहा व्हिडिओ

आशा भोसलेंनी स्वत:च्या हॉटेलमध्ये बनवली दम बिर्याणी; पाहा व्हिडिओ

प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे. आशा भोसले या वेगवेगळ्या कारणाने नेहमी चर्चेत असतात. आतासुद्धा त्या वेगळ्या कारणानं चर्चेत आल्या आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे. आशा भोसले या वेगवेगळ्या कारणाने नेहमी चर्चेत असतात. आतासुद्धा त्या वेगळ्या कारणानं चर्चेत आल्या आहेत. आशा भोसले यांनी नुकतंच त्यांच्या दुबईच्या हॉटेलमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्या स्वयंपाकघरात काम करताना पाहायला मिळत आहे. त्यांची दुबई, कुवेत, अबू धाबी, दोहा, बहरेन यांसारख्या अनेक ठिकाणी हॉटेल आहेत. “आशाज” असे त्यांच्या दुबईतील हॉटेलचे नाव आहे.

आशा भोसले यांची नात जनाईने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.आशा भोसले यांनी खमंग दम बिर्याणी बनवली आहे. ही बिर्याणी तयार झाल्यानंतर त्या छान ती सर्व्ह करतानाही दिसत आहेत. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला आशा भोसलेंनी ‘आओ ना, गले लगालो ना’ हे गाणे लागले आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी ‘दुबई येथील आशाज रेस्टॉरंटमध्ये मला येऊन भेटा’ असेही म्हटले आहे. त्यासोबत त्यांनी #DUBAI #20YEARS, #ASHA’S, WAFI असे कॅप्शन दिलं आहे.

आशा भोसलेंनी स्वत:च्या हॉटेलमध्ये बनवली दम बिर्याणी; पाहा व्हिडिओ
सचिन तेंडुलकरने घातला फेटा; कोणाच्या लग्नासाठी होतोय तयार
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com