Ashutosh Rana B’day Spl;खलनायकाची भूमिका स्वीकारून ‘नायक’ ठरलेला आशुतोष राणा…

Ashutosh Rana B’day Spl;खलनायकाची भूमिका स्वीकारून ‘नायक’ ठरलेला आशुतोष राणा…

Published by :

आशुतोष राणाचा आज म्हणजेच 10 नोव्हेंबरला वाढदिवस असून त्याचा जन्म 1967 मध्ये मध्यप्रदेश मध्ये झाला.आशुतोषने 'स्वाभिमान' या मालिकेपासून करिअरची सुरुवात केली होती. छोट्या पडद्यावरून आशुतोष चित्रपटात आला आणि आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर सर्वांचा लाडका झाला. जख्म, संघर्ष, दुश्मन अशा अनेक चित्रपटातील त्याची शानदार अदाकारी प्रेक्षकांना प्रचंड भावली. 'संघर्ष' या चित्रपटात त्याने साकारलेली सायको किलरची भूमिका प्रचंड गाजली होती.

अभिनेता, कवी, निर्माता, अँकर अशी आशुतोषची ओळख आहे. या प्रत्येक रूपात आशुतोषने स्वत: सिद्ध केले आहे.आशुतोष एका सिनेमासाठी 3 ते 5 कोटी रूपये फी घेतो. एका जाहिरातीसाठी सुमारे 1 कोटी रूपये घेतो. रिअल इस्टेटमध्ये त्याची मोठी गुंतवणूक आहे.आशुतोषने अभिनेत्री रेणुका शहाणेसोबत लग्न केले. या दोघांची लव्हस्टोरी चांगलीच फिल्मी आहे. हंसल मेहताच्या एका सिनेमादरम्यान दोघांची पहिली भेट झाली होती. रेणुकाला एका कवितेद्वारे त्याने प्रपोज केले होते.करिअरच्या सुरूवातीला याच आशुतोषला महेश भट यांनी सेटवरून हाकलून लावले होते. आशुतोष राणा त्यावेळी स्ट्रगल करत होता.

आठवणीतील किस्सा…
● एकदा आशुतोष भट यांना सेटवर भेटायला गेला. त्याने महेश भट समोर दिसताच त्याने त्यांना वाकून नमस्कार केला. पण आशुतोषच्या या वागण्याने महेश भट इतके संतापले की त्यांनी आशुतोषला सेटवरून अक्षरश: हाकलून लावले.
● याचे कारण म्हणजे, महेश भट यांना कुणीही त्यांच्या पाया पडलेले आवडायचे नाही. इतकी अपमानास्पद वागणूक मिळूनही आशुतोषने हिंमत सोडली नाही. तो वारंवार सेटवर गेला आणि प्रत्येकवेळी त्याने महेश भट यांना वाकून नमस्कार केला.
● महेश भट प्रत्येकवेळी संतापले. अखेर एक दिवस, मी इतका संतापतो तरीही तू माझ्या पाया का पडतोस? असे महेश भट यांनी विचारले.
● यावर आशुतोष म्हणाला, मोठ्या व्यक्तिंना चरणस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेणे, माझ्यावरचा संस्कार आहे. तो मी सोडू शकत नाही, त्याचे हे उत्तर ऐकून महेश भट यांनी त्याला अलिंगण दिले. सोबत 'स्वाभिमान'या मालिकेत त्याला रोलही दिला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com