Video : रत्नागिरीत पुन्हा पाय ठेवणार नाही; भरत जाधवांनी जोडले हात, काय झाले नेमके?

मराठीतील दिग्गज अभिनेता भरत जाधव यांना रत्नागिरीच एका नाटक प्रयोगादम्यान भीषण अनुभव आला आहे.

रत्नागिरी : मराठीतील दिग्गज अभिनेता भरत जाधव यांना रत्नागिरीत एका नाटक प्रयोगादम्यान भीषण अनुभव आला आहे. याबाबत भर जाधवांनी नाटकात जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. नाट्यगृहाची अशी अवस्था असेल तर रत्नागिरीत पुन्हा पाय ठेवणार नाही, अशा शब्दात भरत जाधवांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामुळे नाट्यगृहाची दुरवस्था हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

रत्नागिरीत भरत जाधव यांचा शनिवारी रात्री 'तू तू मी मी' हा नाट्यप्रयोग होता. यावेळी एसी आणि साउंड सिस्टीम नसल्याने भरत जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. परंतु, प्रेक्षक एवढे शांत कसे राहू शकतात. एसी नसल्याने काय होतं हे आमच्या भुमिकेतून पहा, असे म्हणत भरत जाधवांनी प्रेक्षकांची हात जोडून जाहिर माफी मागितली. व रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही, असेही भरत जाधव यांनी म्हंटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com