Bigg Boss 16
Bigg Boss 16Team Lokshahi

Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16' च्या पहिल्या स्पर्धकाची घोषणा

टीव्हीचा सर्वात वादग्रस्त शो 'बिग बॉस'चा 16वा सीझन लवकरच सुरू होणार आहे.
Published by :
shweta walge

टीव्हीचा सर्वात वादग्रस्त शो 'बिग बॉस'चा 16वा सीझन लवकरच सुरू होणार आहे. रिअ‍ॅलिटी शोची रिलीज डेट जसजशी जवळ येत आहे तसतशी शोच्या अंतिम स्पर्धकांची यादी जाणून घेण्याची उत्सुकताही लोकांच्या मनात वाढत आहे. हा शो गेल्या सीझनपेक्षा अधिक लोकप्रिय व्हावा यासाठी निर्माते प्रयत्नशील आहेत. रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, यावेळी शोमध्ये अशा अनेक स्पर्धकांची झलक पाहायला मिळणार आहे, ज्यांच्याबद्दल तुम्हाला जास्त माहिती नसेल. 'बिग बॉस 16' साठी आतापर्यंत 18 स्पर्धकांची नावे समोर आली आहेत, त्यापैकी 4-5 स्पर्धकांची पुष्टी होत आहे. दरम्यान, एका स्पर्धकाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

हे आहेत 'बिग बॉस 16' चे पहिले स्पर्धक

बिग बॉस 16 सुरू होण्यासाठी काही दिवस बाकी आहेत, त्यामुळे आता निर्माते हळूहळू स्पर्धकांची नावे जाहीर करत आहेत. अशा परिस्थितीत एका स्पर्धकाच्या नावाचा खुलासा करताना शोचा होस्ट सलमान खानने केला आहे. अब्दु रोजिक असे या तरुणाचे नाव आहे. अब्दू रोजिक हा 'बिग बॉस 16' चा पहिला स्पर्धक आहे. मंगळवारी शोच्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये सलमान खानने अब्दू रोजिकची सर्वांसमोर ओळख करून दिली.

अब्दू हा जगातील सर्वात लहान गायक आहे

विशेष म्हणजे अब्दू हा जगातील सर्वात लहान गायक असल्याचे म्हटले जाते. तो मूळचा ताजिकिस्तानचा आहे आणि त्या देशातील एक प्रसिद्ध गायक आहे, जो आता भारतातही आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे. काही महिन्यांपूर्वी त्याची आणि सलमान खानची दुबईत भेट झाली होती. त्या भेटीत अब्दूने अभिनेत्यासाठी एक गाणे गायले, जे त्याला खूप आवडले. तिथून दोघांची मैत्री झाली. 'बिग बॉस 16' व्यतिरिक्त अब्दू 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातही काम करताना दिसणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com