Bigg Boss 16 Winner Mc Stan
Bigg Boss 16 Winner Mc Stan

Bigg Boss 16 Winner Mc Stan : रॅपर एमसी स्टॅन बिग बॉस 16 चा विजेता

बिग बॉस हा रियालिटी शो भारतामध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. गेले चार महिने बिग बॉसचा 16 वा सिझन रंगला होता. अत्यंत चुरशीच्या फिनालेमध्ये कोण बाजी मारणार? याची उत्सुकता सर्वांनाच होती.
Published by :
Pankaj Prabhakar Rane

मुंबई : बिग बॉस 16 'ला अखेर त्याचा विजेता मिळाला. गेल्या 19 आठवड्यांपासून सुरू असलेल्या या कार्यक्रमच आज ग्रँड फिनाले पार पडला. या ग्रँड फिनाले मध्ये एमसी स्टॅनने बिग बॉसच्या सुंदर ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

Bigg Boss 16 Winner Mc Stan
Jaggu ani Juliet Movie Review : जग्गु आणि जुलिएट जग्गु-जुलिएटसोबतचा सुखकर प्रवास

बिग बॉस 16'च्या टॉप फाईव्हमध्ये शिव ठाकरे, एमसी स्टॅन, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालिन भनोत यांच्यात लढत होती. शालिन आणि अर्चना यांना अनुक्रमे पाचव्या आणि चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. प्रियांका चौधरीचा प्रवास तिसऱ्या क्रमांकावर येऊन थांबला.'बिग बॉस'मध्ये शेवटची लढत रंगली ती महाराष्टरच्या दोन वाघांमध्ये. पुण्याच्या वस्तीतून आलेल्या रॅपर एमसी स्टॅनने शिवला मागे टाकले. पी टाऊनमधून आलेला या स्पर्धकाने आपल्या सध्या सरळ स्वभावाने साऱ्याचे मन जिंकून ट्रॉफी सुद्धा पटकावली.

बिग बॉसच्या विजेत्याला म्हणजेच एमसी स्टॅन बिग बॉसची सुंदर ट्रॉफी, 31 लाख 28 हजार रुपये, कार बक्षीस मिळाली.बिग बॉस 16 च्या घरातील मंडली अखेर हा ट्रॉफीवर हक्क गाजवला. ट्रॉफी मिळताच स्टॅनने सलमान खानच्या सांगण्यावरून रॅप परफॉर्म आणि जाता जाता सर्वांचे आभार मानले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com