बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर लवकरच होणार आई

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर लवकरच होणार आई

Published by :

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर लवकरच आई होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी ट्रोल होणारी स्वरावर स्तुतीसुमने उधळली जात आहे.

मला नेहमीच फॅमिली हवी होती,मुलं हवी होती. आणि आता ती वेळ आली आहे. मी लवकरच आई होणार आहे,माझी फॅमिली असेल, असे वक्तव्य स्वराने केले होते. बऱ्याच काळापासून स्वरा अनाथ मुलांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो या मोहिमेसाठी काम करत आहे.

त्यामुळे स्वरा आई होण्याची बातमी खरी असली तरी ती एका दत्तक घेतलेल्या मुलाची आई होणार आहे. तिने त्यासाठी रीतसर रजिस्ट्रेशन केलं असून दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. "मी भाग्यवान आहे की मी भारतात राहते. कारण आपल्या देशात अविवाहीत स्त्रीला मुल दत्तक दिले जाते. कारण काही देशात मुल दत्तक घेण्यासाठी लग्न करावे लागते. दत्तक घेण्यापूर्वी खूप अभ्यास केला असं स्वरा म्हणाली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com