चार महिन्यांपूर्वीच दिला मुलीला जन्म, आता दुसऱ्यांदा आई होणार ‘ही’  अभिनेत्री

चार महिन्यांपूर्वीच दिला मुलीला जन्म, आता दुसऱ्यांदा आई होणार ‘ही’ अभिनेत्री

गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी पुन्हा एकदा गुडन्यूज देणार आहेत. या जोडीला प्रेक्षकांनी चांगलेच प्रेम दिले आहे. लग्नाच्या 11 वर्षानंतर चार महिन्यांपूर्वीच देबिनाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आता पुन्हा एकदा त्यांच्या घरी छोटा पाहुणा येणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी पुन्हा एकदा गुडन्यूज देणार आहेत. या जोडीला प्रेक्षकांनी चांगलेच प्रेम दिले आहे. लग्नाच्या 11 वर्षानंतर चार महिन्यांपूर्वीच देबिनाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आता पुन्हा एकदा त्यांच्या घरी छोटा पाहुणा येणार आहे.

देबिना पुन्हा एकदा आई होणार आहे. याची माहीती तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे खास दिली आहे. तसेच पती गुरमीत चौधरी आणि मुलगी लियाना चौधरी यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. तसेच या फोटोबरोबर तिने सोनोग्राफी रिपोर्टदेखील दाखवला आहे.

या फोटो सोशल मिडियावर शेअर करत देबिनाने लिहिले की, “काही निर्णय हे देवाच्या हाती असतात. त्यात आपण काहीही बदल करू शकत नाही. हा असाच एक आशीर्वाद आहे. आमचं कुटुंब पूर्ण करण्यासाठी लवकरच नवा पाहुणा येत आहे.” देबिनाने ही पोस्ट शेअर करताना हॅशटॅग सेकंड बेबी असं कॅप्शन दिलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com